breaking-newsराष्ट्रिय

हृदयद्रावक…भावाला किडनी देण्यासाठी ‘त्याने’ केली आत्महत्या

बडोदा : आजारी असलेल्या भावाला किडनी मिळावी, यासाठी इंजिनीअरिंगच्या दुसर्‍या वर्षाला असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पण, त्याच्या पार्थिवाची स्थिती अवयवदान करण्यासारखी नसल्याने त्याच्या किडनी भावाला देता आल्या नाहीत.

गुजरातच्या बडोदा येथील एका इंजिनीअरिंग कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या नैतीकुमार तांडेल याने होस्टेलमध्ये गळफास घेतला.. त्याने पोलिसांना व संस्थेला ही घटना कळवली. पोलिसांना आत्महत्येचे कारण सांगणारी चिठ्ठी नैतीकुमारच्या मृतदेहाजवळ मिळाली. या प्रकरणी कुणाचीही चौकशी करू नये असे त्याने चिठ्ठीत लिहिले होते. नैतीकुमारने लिहिले होते की त्याचा मोठा भाऊ केनीश हा अत्यंत आजारी असून त्याच्या दोन्ही किडनी खराब झाल्या आहेत. किडनीदानाची गरज आहे. माझ्या किडनी त्याला द्याव्यात तसेच अन्य अवयवही गरजूंना द्यावेत अशी इच्छा त्याने व्यक्त केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button