breaking-newsराष्ट्रिय

हुबळीजवळ भीषण अपघात; ६ ठार, १० जखमी

कर्नाटकातील हुबळीजवळ खासगी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात ६ ठार तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी पहाटे हुबळीजवळ राष्ट्रीय महामार्ग ६३ वर घडली. अपघात इतका भीषण होता की, बसच्या मागील भागाचा संपूर्णपणे चुराडा झाला आहे. ही बस मुंबईहून कर्नाटकात निघाली होती. मृतांमध्ये महाराष्ट्रातील रहिवाशांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.

अधिक माहिती अशी, शनिवारी पहाटे मुंबईहून निघालेली खासगी बस हुबळीजवळील राष्ट्रीय महामार्ग ६३ वर असताना त्यांना वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. यात बस उलटून रस्त्याच्या खाली गेली. यात ६ जण ठार झाले. अपघातात १० जण गंभीर जखमीही आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील रहिवाशांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button