breaking-newsराष्ट्रिय

हा दहशतवाद्यांच्या विरोधातील बळाचा वापर नव्हे

  • काश्‍मीरातील स्थितीवरून जेटलींचे टीकाकारांना उत्तर 
    नवी दिल्ली – शरण येण्यास नकार देणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करणे म्हणजे बळाचा वापर नव्हे. तर तो कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे. त्यासाठी काश्‍मीर प्रश्‍नावर राजकीय तोडगा निघे पर्यंत वाट पहाण्याचे कारण नाही असे प्रतिपादन अर्थमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते अरूण जेटली यांनी केले आहे.

काश्‍मीरात लष्कर व सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात कडक भूमिका घेऊन त्यांना टिपण्याचे सत्र अवलंबले आहे त्यावरून मानवाधिकार कार्यकर्ते व राजकीय विरोधकांनी मोदी सरकारवर सुरू केलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी ही टिपण्णी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की तेथील फिदायीन गटातील गनिम स्वता मरायला तयार असतात पण त्यासाठी ते आधी दुसऱ्यांना मारताना मरण पत्करीत असतात त्यामुळे त्यांच्याशी कठोरपणेच मुकाबला केला पाहिजे. त्यांना सत्याग्रह करून थांबवता येणे शक्‍य नाहीं असेही त्यांनी उपरोधिकपणे नमूद केले आहे.

आपल्या फेसबुक पोस्टवर त्यांनी म्हटले आहे की एखादा आपल्याला मारायला पुढे आला तर आपण त्याच्याशी टेबलावर बसून समझोत्याशी चर्चा करू शकतो का?काश्‍मीर खोऱ्यातील सामान्य नागरीकांना वाचवण्यासाठीच सरकारला तेथे हे धोरण स्वीकारावे लागत आहे असे ते म्हणाले. देशाचे सार्वभौमत्व व लोकांचा जगण्याचा अधिकार शाबुत राखण्यासाठीच तेथे आता कडक भूमिका सुरक्षा दलांना स्वीकारावी लागणार आहे. दहशतवाद्यांकडून जेव्हा निष्पाप नागरीकांचे बळी जातात तेव्हा या नागरीकांच्या बाजूने मानवाधिकार संघटना का बोलत नाहींत असा सवालही त्यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button