breaking-newsराष्ट्रिय

हल्ल्यात कितीजण ठार झाले ते मोजण्याचे काम आम्ही करत नाही – हवाई दल प्रमुख

भारतीय हवाई दलाने बालकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेली कारवाई कितपत परिणामकारक ठरली त्यावर काहीजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यावर हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी लक्ष्यावर अचूक प्रहार केल्यानंतर किती जण ठार झाले ते मोजण्याचे काम हवाई दल करत नाही. ते सरकारचे काम आहे असे सांगितले.

ठरवलेल्या लक्ष्यावर प्रहार झाला की, नाही ते आमच्यासाठी महत्वाचे आहे असे धनोआ म्हणाले. भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेला हल्ला तसेच पाकिस्तानच्या ताब्यातून विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका झाल्यानंतर आज प्रथमच हवाई दल प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली.

आम्ही लक्ष्य ठरवल्यानंतर त्यावरच प्रहार करतो. पाकिस्तानातील बालकोटमध्ये आम्ही लक्ष्यावर अचूक प्रहार केला. आम्ही जंगलामध्ये बॉम्ब टाकले असते तर मग पाकिस्तानने त्यावर प्रतिक्रिया का दिली ? असा सवाल हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी विचारला. मिग-२१ बायसन हे पूर्णपणे सक्षम विमान आहे. ते अपग्रेड करण्यात आले आहे. चांगल्या दर्जाच्या रडारसह, हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आणि चांगल्या शस्त्रास्त्रांनी हे विमान सुसज्ज आहे असे हवाई दल प्रमुखांनी सांगितले.

एक ठरवलेले ऑपरेशन असते. ज्याचे नियोजन तुम्ही करता आणि ते प्रत्यक्षात आणता. पण जेव्हा शत्रू तुमच्यावर हल्ला करतो तेव्हा उपलब्ध असलेल्या प्रत्येक फायटर विमानाकडून उत्तर दिले जाते. मग ते फायटर विमान कुठलेही असो. आपली सर्व फायटर विमाने शत्रूचा मुकाबला करण्यास सक्षम आहेत असे हवाई दल प्रमुखांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button