breaking-news

हल्दीरामच्या विक्रीने गाठला एक अब्ज डॉलरचा पल्ला; गाठला नवा उच्चांक

नागपूर | महाईन्यूज

जगप्रसिद्ध खाद्यपेये व स्नॅक्स ब्रँड हल्दीरामने २०१८-१९ मध्ये एक अब्ज डॉलरची (७,१३० कोटी रुपये) विक्री करून एक नवा उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांत हल्दीरामची विक्री दुप्पट झाली आहे. व्हेराटेक इंटेलिजन्स या संस्थेने गोळा केलेल्या सर्वेक्षणानुसार, हल्दीरामने विक्रीच्या बाबतीत मोंडलेझ इंडियाला मागे टाकले असून, आता हल्दीरामची स्पर्धा हिंदुस्तान युनिलिव्हर खाद्यपेये व स्नॅक्स विभागाशी आहे.

हल्दीरामची विक्री २०१७-१८ मध्ये ६,२४१ कोटी होती, त्यात १४ टक्क्यांची वाढ होऊन ती ७,१३० कोटीवर पोहोचली आहे. हल्दीरामच्या विक्रीमध्ये ८० टक्के वाटा पॅक केलेल्या स्नॅक्सचा आहे. याशिवाय हल्दीराम अनेक रेस्टॉरंट शृंखलासुद्धा संचालित करतात. नव्या विक्रमाबाबत बोलताना हल्दीरामचे प्रवक्ते म्हणाले, आम्हाला ग्राहकांना कुठल्या प्रकारचे व कुठल्या चवीचे स्नॅक्स आवडतात, त्याची योग्य जाण आहे. त्यामुळे स्नॅक्सचे उत्पादन व पॅकिंग हे आम्ही स्वत:च करतो. शिवाय आमचे कर्मचारी अत्यंत निष्ठावान आहेत, त्यांचाही या यशात मोठा वाटा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button