Breaking-newsराष्ट्रिय
स्मृती इराणींनी राहुल गांधींना दिलं आव्हान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/smriti-irani-and-rahul-gandhi.jpg)
नवी दिल्ली : देशभरातील विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न करणारे तसेच वेगवेगळी आव्हाने देणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नवं आव्हान दिलं आहे. संसदेतच नाही तर विविध वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या चर्चांमध्ये राहुल गांधी यांनी सहभागी व्हावे.
राहुल गांधींनी पुढाकार घेऊन कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला हवी. पंतप्रधान मोदींनी त्यांना हे आधीच सांगितलं आहे. राहुल संसदेत अथवा थेट आमच्यासमोर चर्चा करू शकतात, असंही स्मृती म्हणाल्या. कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. मात्र, त्यांनी चर्चेसाठी येताना पुस्तक किंवा कागद सोबत आणू नयेत, असंही त्या म्हणाल्या.