breaking-newsआंतरराष्टीय

सौदी अरेबियाचा चीनला मोठा झटका; ‘अरामको’चा १० अब्ज डॉलर्सचा करार रद्द

रियाध – जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाची तेल कंपनी ‘अरामको’ने चीनला मोठा झटका दिला आहे. सौदी अरामकोने चीनसोबतचा १० अब्ज डॉलर्सचा (७५ हजार कोटी) करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या कराराअंतर्गत अरामको चीनसोबत एक रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणार होती. चीनसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

काही महिन्यांपासून जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किंमतीतही घसरण झाली आहे. त्यामुळे या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे. अरामकोने आपल्या चीनमधील गुंतवणूकदारांशी केलेल्या चर्चेनंतर चीनच्या पूर्वोत्तर प्रांतातील लिओनिंगमध्ये गुंतवणूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारातील अनिश्चितता यामागील कारण असल्याचे या प्रकरणाशी निगडीत काही लोकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

अरामकोने सध्या यासंदर्भात कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या चायना नॉर्थ इंडस्ट्रिज ग्रुप कॉर्पोरेशननेदेखील यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या क्षेत्रातील कंपन्यांचे गणित बिघडले असल्याचे म्हटले जात आहे. कच्च्या तेलाची किंमत आणि वाढत्या कर्जाच्या पार्श्वभूमीवर ७५ अब्ज डॉलर्सचे डिविडंट कायम ठेवण्यासाठी अरामको आपल्या खर्चात कपात करण्याची योजनाही तयार करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button