सोने विक्रीबाबतच्या वृत्तावर आरबीआयने दिले स्पष्टीकरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/RBI-696x409.jpg)
- सोन्याची विक्री किंवा सोन्याचा व्यापार बॅंक कधीच करत नाही -आरबीआय
नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने तब्बल तीन दशकांनंतर पहिल्यांदाच सोन्याची विक्री सुरू केली आहे. तसेच बॅंकेने जालान समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून सोन्याच्या ट्रेडिंगमध्येही सक्रीय झाल्याचे वृत्त दोन दिवसांपासून समोर येत आहे. त्याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
![](https://pbs.twimg.com/profile_images/578162805666230272/cCkngdx2_normal.jpeg)
Reports have appeared in certain sections of media that RBI has been selling/ trading in gold of late. It is clarified that RBI has not sold any gold or trading in it. (1/1)1,78810:22 AM – Oct 27, 2019Twitter Ads info and privacy776 people are talking about this
आरबीआय सोन्याची विक्री किंवा व्यापार करत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. पण आरबीआयकडून अशाप्रकारे कोणत्याही सोन्याची विक्री किंवा सोन्याचा व्यापार देखील आरबीआय करत नाही, असे बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ट्विटरद्वारे आरबीआयने हे स्पष्टीकरण दिल आहे. अशाप्रकारचे वृत्त म्हणजे केवळ अफवा असल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे.