breaking-newsराष्ट्रिय

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते जी. नंजुंदन घरात कुजलेल्या मृतावस्थेत

बंगळूरू | महाईन्यूज |

प्रख्यात अनुवादक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते जी. नंजुंदन हे शनिवारी बंगळूरुतील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले आहे. बंगळूरु शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळूरु विद्यापीठात नोकरी करणारे नंजुंदन हे बुधवारपासून कामावर गेलेले नव्हते आणि तेव्हापासून त्यांचा भ्रमणध्वनीही बंद येत होता. ५८ वर्षांचे नंजुंदन हे बंगळूरु विद्यापीठाच्या जननभारती परिसरात सांख्यिकी शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत होते आणि जवळच असलेल्या नागदेवनहळ्ळी भागात राहात होते. घरी ते एकटेच राहात होते व त्यांची पत्नी व मुलगा चेन्नईला राहतात, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

पोलिसांच्या सांगण्यानुसार, नंजुंदन यांच्या विभागातील एक सहाय्यक त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. ‘त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा त्याने प्राध्यापकांच्या चेन्नईतील कुटुंबाला कळवले व त्याया कुटुंबाने आमच्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने त्यांच्या घरी जाऊन दार तोडले, तेव्हा नंजुंदन यांचा कुजलेला मृतदेह आत आढळला’, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button