Breaking-news
सहाराच्या ऍम्बी व्हॅलीचा लिलाव होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/aamby-valley-6.jpg)
नवी दिल्ली – सहारा समुहाच्या ऍम्बी व्हॅलीच्या लिलावातील सर्व अडथळे दूर झाले असून आता या मालमत्तेचा लिलाव होणार हे निश्चित झाले आहे. सेबीच्या खात्यावर 750 कोटी रुपये जमा करण्यास सहारा समुहाला अपयश आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने लिलावाचा निर्णय कायम ठेवला.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने हा निर्णय दिला. सहाराच्या मालमत्तेच्या “लिक्वीडेटर’नी सहाराकडून पैसे जमा न झाल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
ऍम्बी व्हॅलीतील काही भागाचा लिलाव 15 मे पर्यंत होऊ न शकल्याचे सहाराच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे आता ऍम्बी व्हॅलीचा लिलाव करून निर्धारित रकमेची वसुली करण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 जून रोजी करण्याचे न्यायालयाने निश्चित केले आहे.