सलग १४व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ
![Financial ruin to the common man; Diesel and petrol became more expensive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/petrol-pump.jpg)
नवी दिल्ली : गेल्या चौदा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सलग वाढ होत आहे. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिजेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. या चौदा दिवसांमध्ये पेट्रोलचे दर ७.६२ रूपये तर डिझेल ८.२८ रूपयांनी वाढले आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसत आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होत आहे. तरी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ५१ पैसे तर डिझेलच्या दरांत ६१ पैसे प्रती लिटर प्रमाणे वाढ केली आहे.
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिल्लीत पेट्रोलचे आजचे दर ७८.८८ रूपये प्रती लिटर आहे. तर डिझेल ७७.६७ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे. मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबईत पेट्रोलचे आजचे दर ८५.७० रूपये प्रती लिटर आहे. तर डिझेल ७६.११ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे.
चेन्नई आणि कोलकातामध्ये पेट्रोलचे दर क्रमशः ८२.२७ रूपये आणि ८०.६२ प्रती लिटर आहे. डिझेलचे दर क्रमशः ७५.२९ रूपये आणि ७३.०७ रूपये प्रती लिटर आहे. रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल डिझेलचे दर बदलतात. देशात पेट्रोल आणि डिझेलवरील कर ६९ टक्के झाला आहे.