Breaking-newsराष्ट्रिय
श्रीनगरमध्ये पोलिसांच्या शोधमोहीमेत स्फोटकांसह शस्त्रसाठा जप्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/terror-aattack.jpg)
श्रीनगर – जम्मूच्या श्रीनगर येथे जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने राबवलेल्या शोधमोहिमेत शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त करण्यात आली असल्याची माहिती आज सुरक्षा दलाच्या कार्यालयाने दिली.
नातीपोराच्या आझाद वस्तीमध्ये मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटके असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाच्या जवानांनी ही शोध मोहीम राबवली. यावेळी तेथील एका घरातून एक ग्रेनेड आणि पिस्तुल हस्तगत करण्यात आली आहे. तसेच तेथील 3 रहिवासी घर मालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची ओळख पटवण्यात आली असून इस्माइल पार्रे, जावेद पार्रे आणि हिलाल पार्रे अशी त्यांची नावे आहेत.