breaking-newsराष्ट्रिय
शारदा चिटफंड घोटाळ्यात राजीव कुमार यांना अटकपूर्व जामीन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/rajivee-kumar.jpg)
कोलकाता : शारदा चिट फंड घोटाळ्यातील पुराव्यात फेरफार केल्याचा आरोप असलेले कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असून त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. सीबीआयने त्यांना अटक करण्यासाठी कोलकात्यात अनेक ठिकाणी शोध घेतला होता पण ते सापडले नाहीत. त्यामुळे या पथकाला गेल्या आठवडय़ात हात हलवत परत जावे लागले होते.
न्या. ए. मुन्शी व न्या. एस.दासगुप्ता यांनी सांगितले की, जर कुमार यांना सीबीआयने याप्रकरणी अटक केली तर त्यांना पन्नास हजार रुपयांच्या दोन जातमुचलक्यांवर जामिनावर सोडून द्यावे. कुमार यांनी केंद्रीय संस्थेला तपासात सहकार्य केले असून त्यांना कोठडीत टाकून जाबजबाब घेण्याचे कारण नाही.