व्यापार कराराबाबत चीनला ट्रम्प यांची तंबी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Untitled-6-23.jpg)
समझोत्याची प्रक्रिया आताच पूर्ण करण्याचा आग्रह
चीनने आताच व्यापार समझोता करार पूर्ण केला नाही तर आपल्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या मुदतीत म्हणजे २०२० नंतर हा करार करणे खूप अवघड असेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
अमेरिका व चीन यांच्यात सध्या व्यापार युद्ध सुरू असून अमेरिकेने चीनच्या आयात वस्तूंवरचा कर २५ टक्के केला आहे. चीनमधून येणाऱ्या सर्वच वस्तूंवर हा कर लागू करण्यात आला आहे. अमेरिका व चीन यांच्यात व्यापार समझोता चर्चा संपली, पण त्यात करार होऊ शकला नाही. वाटाघाटीकर्त्यांपैकी वरिष्ठ सूत्रांनी सांगितले,की ही चर्चा पुन्हा घेतली जाईल, पण त्याची तारीख निश्चित केलेली नाही. ही चर्चा यापुढे बीजिंग येथे होणार आहे.
चीनला आताच्या वाटाघाटीत योग्य ते मिळाले नाही असे वाटत असेल तरी त्यांना हवा तसा करार करण्यासाठी २०२० मध्ये पक्ष सत्तेवर येण्याची वाट पाहावी लागेल, कारण चीन दरवर्षी अमेरिकेला ५०० अब्ज डॉलर्सना लुटणार असेल तरी ते त्यांना चालणार आहे. मी पुन्हा निवडून आलो तर हा करार आणखी अवघड होईल, असा कठोर इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
वाटाघाटीत अमेरिकेचा फायदा आहे हेच चीनला नको आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था व रोजगार स्थिती कधी नव्हे इतकी चांगली आहे. माझ्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे २०२० नंतर करार किंवा वाटाघाटी करणे चीनला कठीण जाईल. त्यामुळे त्यांनी आताच व्यापार समझोता करार करावा तेच शहाणपणाचे ठरेल, कारण नंतर असे करणे त्यांना सोपे नाही असे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेने चीनच्या २०० अब्ज डॉलर्स कि मतीच्या वस्तूंवरचा आयात कर १० टक्कय़ांवरून २५ टक्के केला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी चीनच्या सर्व म्हणजे ३०० अब्ज डॉलर्सच्या वस्तूंवर आयात कर वाढवण्याचा इशारा दिला आहे. पण ही वाढ लगेच लागू केली जाणार नाही, असे अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लाइटझर यांनी सांगितले.
चीनला वाढीव करांची अडचण असेल तर त्यांनी त्यांच्या वस्तूंचे उत्पादन अमेरिकेत करावे, असे त्यांनी म्हटले आहे. चीनने बौद्धिक संपदा संरक्षण कडक करावे, सरकारी आस्थापनांचे अनुदान कमी करावे, व्यापार तूट कमी करावी असे अमेरिकेचे मत आहे तर अमेरिकेने समतोल करार करावा अशी चीनची अपेक्षा आहे.
चीनला वाढीव करांची अडचण असेल तर त्यांनी त्यांच्या वस्तूंचे उत्पादन अमेरिकेत करावे. वाटाघाटीत अमेरिकेचा फायदा आहे हेच चीनला नको आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था व रोजगार स्थिती कधी नव्हे इतकी चांगली आहे. माझ्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे २०२० नंतर करार किंवा वाटाघाटी करणे चीनला कठीण जाईल. त्यामुळे त्यांनी आताच व्यापार समझोता करणे शहाणपणाचे ठरेल. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका