breaking-newsराष्ट्रिय

व्यसनी आईचा सहा वर्षांच्या चिमुकलीकडून सांभाळ

कर्नाटकमधील कोप्पल येथे अवघे सहा वर्ष वय असणारी भाग्यश्री ही चिमुकली, दारूचे व्यसन जडलेल्या आपल्या आजारी आईला जगवण्यासाठी आठवडाभरापासून भीक मागत असल्याची धक्कादायक व ह्रदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. दुर्गम्मा असे नाव असणारी तिची आई दारूच्या व्यसनामुळे सध्या रूग्णालयात दाखल आहे.

”मला वडील नाही, त्यामुळे मला माझी आई बरी पाहिजे. माझ्याकडे पैसे नाही म्हणुन मी भीक मागते. मी लोकांना पैसे मागते व त्या पैशातुन माझ्या आईला खाऊ घालते.” असे या चिमुकली सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे दुर्गम्माच्या दारूच्या व्यसनामुळे तिच्या नव-याने तिला सोडत दुसरे लग्न केले आहे. भाग्यश्री रूग्णालयाच्या परिसरातच भीक मागून आपल्या आईला खाऊ घालायची. शिवाय तिची सर्व सेवासूश्रुषा देखील करत होती. ही बाब रूग्णालयात येणा-या नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी रूग्णालय प्रशासनास या माय लेकीची माहिती दिली. शिवाय ही बातमी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत देखील पोहचल्याने हे प्रकरण अधिकच उजेडात आले.

ANI

@ANI

Koppal: A 6-year-old girl has been begging since the past week to feed her mother who is admitted to a hospital after she fell ill due to alcoholism. State Women & Child Welfare Department will now pay for the medical treatment of the woman & the education of the girl. pic.twitter.com/sdAeljrbOh

View image on TwitterView image on Twitter
287 people are talking about this

मुख्यमंत्री कार्यालयाने तत्काळ महिला व बाल कल्याण विभागास याबाबत माहिती दिली. तसेच दुर्गम्माला संपूर्ण उपचार मिळवून देण्याचे व ती बरी झाल्यावर तिला तिच्या मुळ ठिकाणी परत पोहचवण्याचे आदेश दिले. यानंतर राज्य महिला व बाल कल्याण विभागाने या प्रकरणाची सखोल माहिती घेत दुर्गम्माच्या संपूर्ण उपचाराची व भाग्यश्रीच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले.

महिला व बाल कल्याण विभागाचे पांचाळ यांनी याबाबत सांगितले की, जेव्हा भाग्यश्रीची आई रूग्णालयात आली होती, तेव्हा तिला चालता देखील येत नव्हते. ही महिला करातगी सिद्दापूराची रहिवासी आहे. तिला एक मुलगा देखील आहे जो इयत्ता चौथीत शिकत आहे. आता आम्ही एका सरकारी शाळेत भाग्यश्रीला शिक्षण देणार आहोत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button