breaking-newsआंतरराष्टीय

वैमानिकाने जेवणाचा डबा धुवायला सांगितल्याने विमानाला उशीर

एअर इंडियाच्या वैमानिकाने क्रू मेम्बरला डबा धुण्यास सांगितल्याने विमानाला उशीर झाल्याची अजब घटना समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, वैमानिक आणि क्रू-मेम्बरची प्रवाशांमोरच भांडणं सुरु झाली होती. सोमवारी बंगळुरु-दिल्ली विमानात हा प्रकार घडला. या घटनेची माहिती नागरी उड्डयन महासंचालकाला देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैमानिकाने क्रू-मेम्बरला आपला जेवणाचा डबा धुवून आणण्यास सांगितलं होतं. यामुळे वैमानिक आणि क्रू-मेम्बरदरम्यान शाब्दिक चकमक उडाली. विमानाचं टेक ऑफ होण्यासाठी काही वेळ शिल्लक असतानाच ही भांडणं सुरु झाली. यामुळे विमानाला एक तास उशीर झाला.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी क्रू-मेम्बर्सना समन्स बजावण्यात आला आहे. नागरी उड्डयन महासंचालकाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button