breaking-newsआंतरराष्टीय

विधिलिखित, अर्थात एका शास्त्रज्ञाचे इच्छामरण…

ऑस्ट्रेलिया – जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नसतो असे आपण नेहमी म्हणतो. जो प्राणी जन्माला आला, तो एके दिवशी हे जग सोडून जाणार हे अगदी निश्‍चित असले, तरी कधी कोठे आणि कशा प्रकारे त्याचा मृत्यू होईल हे कोणीही सांगू शकत नाही. या बाबतीत एक चिमणीची गोष्ट मोठी बोलकी आहे.

एकदा एक चिमणी स्वर्गाच्या दारात एका झाडावर बसली होती. तेथून इंद्राच्या दरबाराता जाणाऱ्या यमदेवाने जाता जाता क्षणभर थांबून तिच्याकडे रोखून पाहिले. आणि तो पुढे गेला. यमाच्या तशा पाहण्याने चिमणीचा जीव घाबरा झाला. हे गरुडाने पाहिले. काय झाले एवढे घाबरायला? त्याने चिमणीला विचारले. हा यम मला भीती दाखवतो. चिमणी म्हणाली. एवढेच ना, गरूड म्हणाला. चल मी तुला इथून अगदी दूर दूर हिमालयावर नेऊन सोडतो. म्हणजे तुला यमाची भीती वाटणार नाही. आणि गरुडाने तिला आपल्या पाठीवर बसवून अगदी दूर दूर हिमालयावर आणून सोडले. सुटकेचा एक नि:श्‍वास सोडून शांत चित्ताने चिमणी झाडावर बसणार तोच तेथे यमराज आले. म्हणाले, बरे झाले तू येथे आलीस. मी हाच विचार करत होतो, की तुझा मृत्यू येथे हिमालयावर लिहिलेला असताना तू स्वर्गाच्या दारात काय करत आहेस. चला, गरुडाने चांगले काम केले. तुला येथे आणले. चल आता……

तशी ही गोष्ट अत्यंत अर्थपूर्ण आहे. विधिलिखित कोणी टाळू शकत नाही हे सिद्ध करणारी आहे. अशीच गोष्ट एका शास्त्रज्ञाच्या बाबतीत घडली आहे. डेव्हिड गुडॉल नावाच्या या ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाने दूर स्वित्झर्लंडमध्ये जाऊन मृत्यूला मिठी मारली. त्याने इच्छामरण स्वीकारले. गुडॉल हा शास्त्रज्ञ शतायुषी होता. त्याने वयाची 104 वर्षे पूर्ण केली होती. सर्वार्थाने तृप्त होता, आयुष्याचे शतक पूर्ण केल्यानंतरही त्याला काही शारीरिक व्याधी नव्हती. फक्त त्याची जगण्याची इच्छा संपली होती. जगण्यासारखे काहीतरी आहे, तोपर्यंत मरावे अशा मताचा होता तो. त्याने आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला होता आणि शेवटी इच्छामृत्यूची मागणी करत होता तो.

एग्झिट फाऊंडेशशनने त्याची हाक ऐकली आंणि त्याला इच्छामृत्यू देण्याची तयारी दाखवली. त्यासाठी त्याला स्वित्झर्लंडमध्ये जावे लागले. कारण तेथेच इच्छामृत्यूचा कायदा आहे. अन्य कोठेही नाही, आणि ज्या मोजक्‍या ठिकाणी इच्छामृत्यूचा कायदा आहे, तेथील कायदे मोठे कडक आहेत.

एडमंटन, लंडन येथे 4 एप्रिल 1914 रोजी जन्मलेले डेव्हिड गुडॉल ऑस्ट्रेलियात वाढले आणि मरण्यासाठी स्वत:हून स्वित्झर्लंडमध्ये गेले. तेथे जाण्यासाठी त्यांना वेबसाईटमार्फत 376 दात्यांकडून 20 हजार डॉलर्सची मदत देण्यात आली होती. मृत्यूची भेट घेण्यापूर्वी एक दिवस त्यांनी फ्रान्समध्ये जाऊन आपल्या नातेवाईकांची भेट घेतली. आपल्या इच्छामृत्यूबाबत त्यांना पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला एग्झिट फाऊंडेशनने दिला. पण ते आपल्या मतावर ठाम होते. खंबीर मनाने त्यांनी 10 मे 2018 रोजी मृत्यूला मिठी मारली. मृत्यूपूर्वी त्यांनी पत्रकारांना मुलाखत दिली, गाणे म्हणून दाखवले आणि बिथोवनची सिंफनी 9 ऐकता ऐकता स्वत:चा प्राण घेणारा व्हाल्व्ह खोलला. त्याच्या शरीरात नेब्युटल हे द्रव्य गेले आणि त्याचा आत्मा अनंतात विलीन झाला.

आता या गोष्टीचे ऍनेलिसिस प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने करील. वेगळा अर्थ लावील. आपल्या संस्कृतीप्रमाणे त्याच्या नशिबी स्वित्झर्लंडमध्ये स्वत:च्या हाताने मरण लिहिले होते, ते त्याला मिळाले, विधिलिखित कोणी टाळू शकत नाही, एवढाच निष्कर्ष निघतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button