breaking-newsराष्ट्रिय

विद्यार्थिनींची छेड काढू नका म्हणणाऱ्या शिक्षकाला मुलांकडून बेदम मारहण

विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या शिक्षकालाच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज जवळ ही घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलीस मारहाण करणाऱ्या मुलांचा शोध घेत आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जवळ असलेल्या सोरावमध्ये शिक्षकाला मारहाणीची ही घटना घडली आहे. बालकरपूर येथील आर्दश जनता महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी काही मुलांचा ग्रुप तिथे आला. मुलांनी विद्यार्थिनींची छेड काढायला सुरूवात केली. छेड काढण्यावरून शिक्षकांनी त्या मुलांना फटकारले. त्यानंतर मुले घरी गेली आणि कुटुंबातील इतर माणसांना घेऊन महाविद्यालयात आली. त्यांनी शिक्षकांना वर्गातून खेचत बाहेर काढले आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, शिक्षकाला मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहोत, अशी माहिती गंगापरचे पोलीस अधिकारी नागेंद्रसिंह यांनी एएनआयला दिली. त्याचबरोबर घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button