Breaking-newsआंतरराष्ट्रीय
विजय मल्ल्या, निरव मोदी आणि ललित मोदीचं प्रत्यार्पण करा, भारताची ब्रिटनकडे मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/nirav-modi-lalit-modi-and-mallya.jpg)
लंडन : बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्या, माजी आयपीएल मॅनेजर ललित मोदी आणि निरव मोदी यांचे लवकरात लवकर भारतात प्रत्यार्पण केलं जावं अशी मागणी भारताने ब्रिटनकडे केली आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये चर्चा सुरु झाली असून यावेळी ही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी भारताने लंडनमध्ये भारत-विरोधी कारवाया वाढल्या असल्यावरुन चिंता व्यक्त करत ब्रिटनच्या जमिनीचा वापर काश्मिरी आणि खलिस्तानी फुटीरवाद्यांना करु देऊ नये अशी मागणीही केली. भारतातून फरार झालेल्या तसंच आर्थिक घोटाळ्यातील आरोप ज्यांनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतला आहे त्यांच्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली