विजय मल्या ‘फरारी’ व्यक्ती – ब्रिटिश न्यायालयाचा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/vijay-mallya.jpg)
लंडन (ब्रिटन) – उद्योगपती विजय मल्ल्या याला ब्रिटिश न्यायालयाने आणखी एक धक्का दिला आहे. न्यायालयाने त्याला “फरारी’ घोषित केले आहे. विजय मल्ल्या याच्याविरुद्ध भारतात फसवणूक आणि मनी लॉंड्रिंगची प्रकरणे आहेत.
प्रत्यार्पणाचा विरोध करण्यासाठी झगडणारा विजय मल्ल्या फरारी असल्याचे उच्च न्यायालयाने जाहीर केले आहे.आपण 1988 पासून अनिवासी भारतीय असून 1992 पासून इंग्लंडमध्ये राहत असल्याचा मल्ल्या याचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
एकूण परिस्थिती आणि प्रत्यार्पणास विरोध करण्याचा प्रयत्न विजय मल्ल्या यांला फरारी घोषित करण्यासाठी पुरेसा आधार असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे. बॅंकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर मल्ल्या देश सोडून पळालेला आहे. त्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी भारताने ब्रिटनकडे मागणी केली असली तरी त्यांनी प्रत्यार्पणास विरोध केला होता. न्यायमूर्ती हेनशॉ यांनी मंगळवारी मल्ल्या यांची संपत्ती जप्त करण्याचा आदेश रद्द करण्यास नकार दिला होता. भारतातील 13 बॅंकांनी विजय मल्ल्या याच्याकडून 1.55 अब्ज डॉलर्स वसूल करण्याबाबतचा भारतीय न्यायालयाचा आदेश योग्य असल्याचा निर्णय त्यांनी दिला होता.