ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदी उत्तम पाचारणे
नवी दिल्ली – ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदी प्रसिध्द शिल्पकार उत्तम पाचारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. पाचरणे एक प्रख्यात कलाकार आणि शिल्पकार आहेत. त्यांनी कला क्षेत्राच्या विविध पदांवर काम केले आहे. सध्या ते गोवा कला अकादमीचे सदस्य आणि सल्लागार समिती सदस्य, पु.ल. देशपांडे राज्य ललित कला अकादमीचे सल्लागार समितीचे सदस्य आणि बोरिवली येथील जनसेवा सहकारी बॅंकेचे संचालक पदावर कार्यरत आहेत.
उत्तम पाचारणे हे सर जे जे स्कूल ऑफ आर्टस मुंबई या प्रतिष्ठित संस्थेतून पदवीधारक आहेत. त्यांना प्रतिष्ठित असे विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1985 साली त्यांना राष्ट्रीय ललित कला पुरस्कार, 1985मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. प्रफुल्ल डहाणूकर फाऊंडेशन या संस्थेकडून ज्यूनियर राष्ट्रीय पुरस्कार 1986मध्ये, तर वर्ष 2017 मध्ये जीवन गौरव पुरस्कार मिळाले आहे. पाचरणे अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळल्यानंतर, सदरील पदावर तीन वर्षांसाठी पद धारण करतील.