breaking-newsराष्ट्रिय

रेशन कार्ड, गॅस सिलेंडर नियमांमध्ये आजपासून ‘हे’ मोठे बदल

मुंबई : देशात एकिकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम लागू करण्यात आलेले असतानाच नियमांच्या या सत्रामध्ये आता आज म्हणजेच १ जूनपासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यांपैकी काही बदलांमुळं नागरिकांना अंशत: सूट मिळणार आहे. तर, काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला याचा फटकाही बसू शकतो. 

देशभरातील गरीब जनतेला दिलासा देण्यासाठी म्हणून जवळपास २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘वन नेशन वन कार्ड’ ही योजना राबवण्यात येणार आहे. ज्याअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना देशातील कोणत्याही भागात त्यांच्या रेशन कार्डच्या माध्यमातून धान्य मिळवता येणार आहे. जवळपास ६७ कोटी जनतेला याचा फायदा होईल. तीन रुपये प्रतिकिलो तांदूळ आणि दोन रुपये प्रतिकिलो गहू या दरानं धान्यवाटप करण्यात येणार आहे. स्थानिक, हिंदी किंवा इंग्रजी अशा भाषांमध्ये हे रेशन कार्ड दिलं  जाईल. याशिवाय रेशन कार्ड आधार कार्डाशी जोडण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर असल्याचंही केंद्रीय अन्नपुरवठा मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button