breaking-newsराष्ट्रिय

रेल्वे आणि विमान तिकीटांवरील मोदींचे छायाचित्र का हटवले नाही? ; निवडणूक आयोग

रेल्वे आणि विमान तिकीटांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र का हटवले नाही, असा जाब निवडणूक आयोगाने रेल्वे मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला विचारला आहे. यासंदर्भात संबंधित विभागांनी तीन दिवसांमध्ये उत्तर द्यावे, असे देखील निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

एअर इंडियाच्या विमान तिकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असते. मात्र, सध्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे रेल्वे आणि विमान तिकीटांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्रावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. आठवड्याभरापूर्वी यासंदर्भात तृणमूल काँग्रेसने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. रेल्वे तिकीटांवर मोदींचे छायाचित्र छापणे बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली होती.

निवडणूक आयोगाने या तक्रारींची दखल घेतली असून निवडणूक आयोगाने यासंदर्भात रेल्वे मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला जाब विचारला आहे. तिकीटांवरुन मोदींचे छायाचित्र का हटवले नाही, असा सवाल निवडणूक आयोगाने संबंधित मंत्रालयांना विचारला आहे. यावर तीन दिवसांमध्ये उत्तर द्यावे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button