Breaking-newsराष्ट्रिय
राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी पंकज सरन यांची नियुक्ती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/pankaj-saran.jpg)
नवी दिल्ली – केंद्र सरकारने आज राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी वरिष्ठ राजनैतिक अधिकारी पंकज सरन यांची नियुक्ती केली. सरन सध्या भारताचे रशियातील राजदूत म्हणूून कार्यरत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ लाभेल. ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहतील.
सरन हे भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) 1982 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांची नोव्हेंबर 2015 मध्ये भारताचे रशियातील राजदूत म्हणून नियुक्ती झाली. भारतात आणि भारताबाहेरही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी याआधी बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली. याशिवाय, 2007 ते 2012 या कालावधीत ते पंतप्रधान कार्यालयात सहसचिवपदावर कार्यरत होते.