राष्ट्रीय नेमबाज मुलीने केली आई आणि भावाची हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Gun-Firing_2017071806.jpg)
लखनऊ – रेल्वेचे अधिकारी आर. डी. बाजपेयी यांच्या १५ वर्षांच्या राष्ट्रीय नेमबाज मुलीने आपली आई आणि भावाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना लखनऊमध्ये उघडकीस आली आहे. आई आणि भावाची हत्या केल्यानंतर ही मुलगी दुसऱ्या खोलीत शांतपणे बसली होती. त्यामुळे संशय आल्याने तिची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, अशी माहिती पोलीस उपायुक्त सोमेन वर्मा यांनी दिली.
लखनऊमध्ये आई आणि मुलाची हत्या झाल्याची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याचा तपास सुरू केला. त्यावेळी बाजपेयी यांची १५ वर्षांची मुलगी एका खोलीत शांतपणे बसली होती. ती कोणाशी काहीच बोलत नव्हती. तिच्या हालचालीही संशयास्पद होत्या. त्यामुळे पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तिच्या खोलीत .२२ बोअरचे रिवाल्वर सापडले आहे. आई आणि भावाची आपणच गोळ्या घालून हत्या केल्याचे या मुलीने आजी-आजोबांसमोर कबूल केले आहे.