breaking-newsराष्ट्रिय

राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये सरकार लवकरच गुंतवणार दहा हजार कोटी

नवी दिल्ली – डबघाईला येत असलेल्या राष्ट्रीय कृत बॅंकांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने या बॅंकांमध्ये 65 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा या आधीच केली आहे पण अजून त्यातील एक रूपयाही त्यांनी बॅंकांना दिलेला नव्हता. पण आता मात्र यातील दहा हजार कोटी रूपये लवकरच बॅकांना दिले जाणार आहेत अशी माहिती केंद्र सरकारकडून आज देण्यात आली.

सध्या कर्जबुडवे पणाच्या प्रकारांमुळे राष्ट्रीयकृत बॅंकां अडचणीत आल्या आहेत. तसेच त्यांच्या नफ्याचेही प्रमाण घटून तोटा वाढू लागल्याने त्यांना बॉंड किंवा ठेवींवरील व्याज देण्यात सुद्धा अडचणी निर्माण झाल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे असे सांगण्यात येते. ज्या बॅकांपुढे भांडवलाची कमालीची टंचाई आहे अशा चार ते पाच बॅकांना हे दहा हजार कोटी रूपये दिले जाणार आहेत. या बॅकांमध्ये पंजाब नॅशनल बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, कार्पोरेशन बॅंक इत्यादी बॅंकांच समावेश आहे. केंद्र सरकारने दोन आर्थिक वर्षांमध्ये एकूण 2 लाख 11 हजार कोटी रूपयांचा भांडवल पुरवठा राष्ट्रीय कृत बॅंकाना करण्याचे घोषित केले होते. त्यातील 65 हजार कोटी रूपये अद्याप बाकी आहेत. त्यातूनच हे दहा हजार कोटी रूपये बॅंकांना दिले जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button