Breaking-newsराष्ट्रिय
‘राझी’ने गाठला १०० कोटींचा टप्पा !!!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/raazi-2-1.jpg)
‘राझी’ चित्रपटानं अल्पावधीतच शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे. करण जोहरनं ट्वीट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करत ‘आलिया आणि दिग्दर्शक मेघना गुलजार यांचं कौतुकही केलं आहे. आलिया आणि विकी कौशल यांची मुख्य भूमिका आणि दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी आपल्या शैलीत ‘राझी’ची कहाणी प्रेक्षकांसमोर आणली. गेल्या काही काळात आलेल्या महिला प्रधान चित्रपटांमध्ये राझीनं जवळजवळ सगळेच विक्रम मोडीत काढले आहेत.
जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे विनीत जैन, करण जोहर, हिरु यश जोहर आणि अपूर्व मेहता हे चित्रपटाचे निर्माते असून प्रीती शहानी या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत.