breaking-news

राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा अर्धवट ; उद्या परतणार मुंबईत

औरंगाबाद | महाईन्यूज

मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांचा मराठवाडा दौरा अर्धवट सोडणार आहेत. राज ठाकरेंचामराठवाडा दौरा तीन दिवसांचा होता. मात्र ते उद्या सकाळीच मुंबईत परतणार आहेत. राज यांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. मात्र यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.राज ठाकरे काल संध्याकाळी औरंगाबादला पोहोचले. ते १६ फेब्रुवारीला मुंबईला परतणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांचे कार्यक्रम ठरलेले होते.

मात्र आता राज यांनी मराठवाडा दौरा गुंडाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज ठाकरे उद्या सकाळी मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे त्यांचे उद्याचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राज ठाकरे उद्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणार होते. ते शिक्षकांच्या संमेलनादेखील उपस्थित राहणार होते. याशिवाय काही हिंदुत्ववादी संघटना आणि प्रतिष्ठीत व्यक्तींनादेखील भेटणार होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button