breaking-newsराष्ट्रिय

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७,८०,६८९ वर

  • मुंबईत १,२३७, पुणे शहरात १,६५८ नवे रुग्ण

मुंबई – रविवारी एका दिवसात राज्यात कोरोनाचे १६ हजार ४०८ नवे रुग्ण आढळून आले. तर ७ हजार ६९० रुग्ण बरे झाले. यासह राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता ५ लाख ६२ हजार ४०१ इतकी झाली आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ८० हजार ६८९ वर पोहोचली आहे. यापैकी १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत राज्यात २४ हजार ३९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी मुंबईत १ हजार २३७ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली असून ती २० हजार ३२५ इतकी झाली आहे. तर दिवसभरात ३० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे येथील एकूण मृतांचा आकडा ७ हजार ६२३ वर पोहोचला आहे. तसेच दिवसभरात ८५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यासह मुंबईत आतापर्यंत ८१ टक्के म्हणजेच १ लाख १६ हजार ३५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे शहरात रविवारी दिवसभरात १ हजार ६५८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १ हजार ५०२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तसेच ४९ बाधितांनी आपला जीव गमावला. यासह शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजार ४९७ वर पोहोचली आहे. यापैकी ७६ हजार ६८६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर २ हजार २६७ कोरोनाबाधितांचा बळी गेला असून सध्या १५ हजार ५४४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button