breaking-newsआंतरराष्टीय

“राजनाथ यांनी केलेली शस्त्रपूजा योग्यच”; थेट पाकिस्तानी लष्कराचा पाठिंबा

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पहिले राफेल विमान ताब्यात घेतना शस्त्रपूजा केल्याने टीका होत असताना आश्चर्यकारकरित्या पाकिस्तानी लष्कराने मात्र त्यांच्या या कृतीचं समर्थन केलं आहे. नेहमी भारतावर टीका करत वादग्रस्त वक्तव्य करणारे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी राजनाथ सिंह यांनी राफेल विमान ताब्यात घेताना केलेली शस्त्रपूजा योग्य असल्याचं सांगितलं आहे. “राफेलची पुजा ही परंपरेनुसार आहे, त्यामुळे त्यात काही वावगं नाही,” असं आसिफ गफूर यांनी म्हटलं आहे.

आसिफ गफूर यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, “राफेल पूजा परंपरेनुसार आहे, त्यामुळे त्यात काही गैर नाही. त्याचा आदर केला पाहिजे. लक्षात ठेवा…हा फक्त एका मशीनचा प्रश्न नाही तर मशीनचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीची क्षमता, भावना आणि संकल्पही महत्त्वाचं आहे”.

राजनाथ सिंग यांनी दसऱ्याच्या दिवशी राफेल विमान ताब्यात घेताना विमानावर ओम चिन्ह रेखाटत नारळ वाढवला होता. तसंच चाकाखाली लिंबूही ठेवले होते. राफेलची पूजा केल्याने राजनाथ सिंग यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली होती. अनेक मिम्सदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button