breaking-newsराष्ट्रिय

राजधानीत हाय अलर्ट जारी

नवी दिल्ली : दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविली जाते आहे. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर दिल्लीचं इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, बस स्थानकं, रेल्वे स्टेशन आणि दिल्लीतील काही मॉल्स असल्याची माहिती मिळते आहे. यामुळे दिल्लीमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

एका वृत्तपत्राला पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टसारखे दिवस नसूनही अशा प्रकारे माहिती मिळणं धक्कादायक आहे. त्यामुळे अलर्टला गंभीरपणे घेतलं जात आहे. अलर्ट मिळाल्यापासून दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणी तपास वाढविण्यात आला आहे. विशेष करून दिल्ली एअरपोर्टवर विमान हायजॅकची शक्यता आणि रेल्वे स्टेशनवर गोळीबाराची शक्यता लक्षात घेता प्रत्येक गाडीची तपासणी केली जातीये.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button