breaking-newsआंतरराष्टीय
रशियावरील प्रतिबंध दूर करणे सर्वांनाच लाभदायक – पुतीन
व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) – रशियावर लादण्यात आलेले प्रतिबंध दूर करणे सर्वांनच लाभदायक आहे, असे उद्गार रशियाचे अध्यक्ष ब्लदिमीर पुतीन यांनी काढले आहेत. पश्चिमात्य राष्ट्रांनी रशियावर अनेक प्रतिबंध लादले आहेत मात्र हे प्रतिबंध लागू करून काहीही परिणाम झालेला नाही. जर हे प्रतिबंध काढून टाकले, तर मॉस्कोचा आणि पाश्चिमात्य राष्ट्रांचाही फायदाच होईल असे ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आलेल्या पुतीन यांनी म्हटले आहे.
प्रतिबंधांनी सर्वांचेच नुकसान होते. ज्यांच्यावर प्रतिबंध लागू केले आहेत, त्यांना तर ते हानिकारक आहेतच, पण ज्यांनी प्रतिबंध लागू केले आहेत, त्यांनाही ते नुकसानकारकच आहेत, असे पुतीन यांनी प्रतिपादन केले.