breaking-newsआंतरराष्टीय

युद्धासाठी तयार व्हा! चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा सैन्याला इशारा

बिजिंग : मंगळवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशातील लष्कराला उद्देशून अत्यंत महत्त्वाचा इशारावजा संदेश दिला. त्यांच्या या वक्तव्यानं साऱ्या विश्वाचं लक्ष वेधलं गेलं. चीनमधील सद्यपरिस्थिती पाहता त्यांनी लष्कराचा आत्मविश्वास वाढवत केलेल्या संबोधनपर भाषणात युद्धासाठी सज्ज होण्याची हाक दिली आहे. 

चीनच्या राष्ट्राध्यक्षांची ही हाक भारतासाठी तणावाची परिस्थिती निर्माण करु शकेल का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तसं नाहीये. कारण, जिनपिंग यांनी या इशारा कोरोना व्हायरसच्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर दिल्याचं सांगण्यात येत आहे. 

कोविड 19 अर्थात कोरोना व्हायरसच्या वैश्विक महामारीचा देशाच्या संरक्षण यंत्रणेवर होणारा दूरगामी परिणाम पाहता या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लष्कराने युद्धासाठी सज्ज व्हावं असा इशारा त्यांनी दिला. हे युद्ध असेल कोरोना व्हायरससोबतचं. असं असलं तरीही अमेरिका आणि भारतासह चीनचं सध्याचं नातं पाहता कोरोनाच्या नावाआड चीनमध्ये नेमकी कोणत्या युद्धाची तयारी होते, याकडे साऱ्यांचं लक्ष असेल. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button