breaking-newsराष्ट्रिय

‘या’ महिला कोब्रा कमांडोसमोर थरथर कापतात नक्षलवादी

आज असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात महिलांनी आपले वर्चस्व सिद्ध केले नाही. अशीच एक अभिमानास्पद बाब म्हणजे उषा किरण यांनी देशातील पहिल्या महिला कोब्रा कमांडो होण्याचा मान मिळवला आहे. छत्तीसगढमधील बस्तरमध्ये त्या आज नक्षलवाद्यांचा सामना करत आहेत. उषा किरण यांनी केमिस्ट्रीतून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. आज उषा यांच्या नावाची भितीही नक्षलवाद्यांच्या मनात बसली आहे.

उषा किरण या बटालियन फॉर रेसोल्यूट अॅक्शन (कोब्रा) च्या पहिल्या महिला आणि सर्वात युवा सदस्य आहेत. वडिल आणि आजोबा यांच्यानंतर सीआरपीएफमध्ये सहभागी होणारी त्यांची तिसरी पिढी आहे. ”कोब्रामध्ये सहभागी होण्याचा निर्णय सर्वस्वी आपलाच होता,” अशी माहिती उषा यांनी दिली. सीआरपीएफच्या अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या बस्तरमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी काम करताना सीआरपीएफच्या काउंटर इंसर्जेंसी ऑपरेशनबाबत आणि कोब्रा कशाप्रकारे काम करतात याचीदेखील माहिती मिळाली. यानंतर या महत्त्वपूर्ण कोब्रा फोर्समध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या.

” माझे वडिल प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणारी परेड पाहण्यासाठी घेऊन जात असंत. त्यावेळी सैन्याच्या पोषाखाबद्दल आकर्षण निर्माण होत गेले. तसेच काळानुरूप सैन्याच्या कामाबद्दलही माहिती मिळत गेली,” असे उषा यांनी सांगितले. ”कोब्रा बटालियनमध्ये सामिल होणे हे कोणत्याही महिलेसाठी आव्हानात्मक आहे. मी एक मोठा निर्णय घेतला कारण कोब्रा १० बटालियन कमांडोंची एक फोर्स आहे. तसेच यामध्ये कोणतीही महिला सदस्य नाही.” असेही त्या म्हणाल्या.

” कोब्रा एक स्पेशल कमांडो फोर्स आहे आणि यात दुसऱ्या कमांडो ग्रुपसोबत काम करावे लागते. यामध्ये शरीराचा फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. महिला आहोत म्हणून प्रशिक्षणादरम्यान देण्यात येणाऱ्या टास्कसाठी अतिरिक्त वेळ मागता नाही. महिलांसाठी एक उदाहरण म्हणून मी या ठिकाणी आहे आणि मला कोणत्याही पायरीवर अपयशी व्हायचे नाही,” असे त्या बोलताना म्हणाल्या. सध्या बस्तरमधील नक्षल विरोधी कारवायांमध्ये उषा या आपल्या टिमचे नेतृत्व करत आहेत. कोब्रा कमांडो हे घनदाट जंगलात राहून नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी आणि धाडसासाठी ओळखले जातात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button