breaking-newsराष्ट्रिय

…म्हणून ‘ति’च्या कुटुंबियांनी ‘त्या’ तरुणाचं गुप्तांग छाटलं

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यामध्ये एका प्रियकराचं गुप्तांग छाटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेल्यानंतर त्याला तिच्या घरच्यांनी पकडलं, आणि मारहाण करुन थेट त्याचं गुप्तांगच छाटलं. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, गुप्तांग शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा जोडणे अशक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती आहे.

गोरखपूरमधील महुआडाबर गावातील ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीचे दोन भाऊ आणि वडिलांना अटक केली आहे. मंगळवारी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर हा 20 वर्षांचा तरुण त्याच्या प्रेयसीला भेटायला थेट तिच्या घरी गेला होता. दोघं मुलीच्या खोलीत असताना याबाबतची कुणकुण तिच्या भावाला लागली, आणि भावाने त्याला पकडलं. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी त्याला बेदम मारहाण केली व त्याचे गुप्तांगच छाटले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकरी तेथे जमा झाले. जखमी अवस्थेत विव्हळत पडलेल्या तरुणाला पाहून गावकऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावली व रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर गावकऱ्यांनीच या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी मुलीचे दोन भाऊ आणि वडिलांना अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button