मोदी – जिनपिंग यावर्षी आणखी तीन वेळा भेटणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/modi-xi-jinping-china.jpg)
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात यावर्षी आणखी तीन वेळा थेट भेट होणार आहे असे चीनचे भारतातातील राजदूत लुओ झाओहुई यांनी आज सांगितले. भारत-चीन संबंधांबाबत येथे आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की गेल्याच आठवड्यात दोन्ही नेत्यांमध्ये चीन मध्ये विस्तृत चर्चा झाली आहे. त्यात दोन्ही देशांनी आपसातील सहकार्य आणखी व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापुढील काळात होणाऱ्या आणखी तीन भेटींतून हे संबंध आणखी विस्तारतील अशी आपल्याला आशा आहे असे ते म्हणाले. भारताला चीन कडून किती महत्व दिले जाते याविषयी माहिती देताना चीनी राजदूतांनी सांगितले की आजपर्यंत चीनच्या अध्यक्षांनी कोणत्याही नेत्याला बिजींगच्या बाहेर दोन वेळ भेट देऊन चर्चा केलेली नाही. पण मोदींना त्यांनी बिजींगच्या बाहेर नेऊन चर्चा केली आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. यातून चीन भारताला किती महत्व देतो ते अधोरेखीत होते असे ते म्हणाले.