Breaking-newsराष्ट्रिय
मोदींच्या सभेत काळ्या कपडय़ांना मनाई!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/modi-1.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी झारखंडमधील पलामू जिल्ह्य़ात सभा होत असून त्यांना काळे झेंडे दाखवले जाऊ नयेत, यासाठी सभास्थानी कोणत्याही प्रकारचे काळे कपडे घालून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. हा नियम सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही लागू आहे. पलामू पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. राज्यात गेले तीन महिने कंत्राटी शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्याकडून मोदी यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे आदेश जारी करण्यात आले आहेत.