breaking-newsराष्ट्रिय

‘मुस्लीम काँग्रेसला मतदान करु शकतात तर हिंदू भाजपाला का नाही ?’

राजस्थानमध्ये विधानसभा मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे. त्याचप्रमाणे राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. भाजपा आणि काँग्रेसने मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि राज्यमंत्री धनसिंह रावत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. सर्व मुस्लीम जर काँग्रेसला मतदान करु शकतात तर हिंदू एकजुट होऊन भाजपाबरोबर का येऊ शकत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे..

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Rajasthan mein jitne bhi Hindu hain un sabhi Hinduon ko ekjut BJP ko vote dena hai. Agar Congress ke saath judd kar saare Muslim matdaan kar sakte hain toh saare Hindu BJP ke saath ja sakte hain aur prachand bahumat se BJP ko jita sakte hain: Rajasthan Minister Dhan Singh (26.10)

एका संमेलनात उपस्थितांसमोर धनसिंह रावत बोलत होते. ते म्हणाले, मुस्लीम काँग्रेसबरोबर जाऊन त्यांना एकगठ्ठा मतदान करु शकतात. तर सर्व हिंदू एकत्र येत भाजपाबरोबर का येऊ शकत नाहीत. केवळ हिंदुच भाजपाला प्रचंड बहुमत मिळवून देऊ शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही परिस्थिती मुसलमान काँग्रेसला मतदान करु शकतात. सर्व हिंदू एकत्रित येत भाजपाला पूर्ण बहुमताने निवडून देऊ शकतात.

काँग्रेसचा अर्थच मुसलमान आहे. प्रत्येक मुसलमानाने काँग्रेसला मतदान केले आहे. राजस्थानमधील जितके हिंदू आहेत त्यांनी एकत्र येत भाजपाला मतदान केले पाहिजे. धनसिंह रावत यांच्या या वक्तव्यामुळे भाजपासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या आचारसंहिता लागू आहे. या दरम्यान जाती-धर्माबाबत केलेले हे वक्तव्य भाजपासाठी डोकेदुखी ठरु शकते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button