breaking-newsराष्ट्रिय

मुंबईच्या हवाला ऑपरेटरनेही पीएनबी बॅंकेला 2252 कोटींना फसवल्याचे उघड

ईडीने चार्जशिट दाखल केल्यानंतर उघड झाला प्रकार 
मुंबई – केवळ नीरव मोदी किंवा चोक्‍सी यांनीच नव्हे तर मुंबईतील एका हवाला ऑपरेटरनेही पंजाब नॅशनल बॅंकेला तब्बल 2252 कोटी रूपयांना फसवले आहे. ईडीने या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही बाब समोर आली आहे. महंमद फारूख असे या हवाला ऑपरेटरचे नाव आहे. तो तेथील एक प्रख्यात हवाला ऑपरेटर आहे.

महंमद फारूख ने सन 2015-16 मध्ये 13 कंपन्या स्थापन करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनिलॉंड्रिंग केले. तसेच खोटे व्यवहार दाखवून 2252 कोटी रूपये चीन आणि हॉंगकॉंग मधील खात्याकडे वर्ग केल्याची उघड झाले आहे. हा इंम्पोर्ट रिमीटन्स घोटाळा आहे. ईडीने म्हणजेच सक्त वसुली विभागाने महंमद फारूख याच्याबरोबरच त्याचा भाऊ महंमद घौस, मुरारीलाल झुनझुनवाला, अनुप झुनझुनवाला, स्टेलकॉन इन्फ्राटेल कंपनी आणि अनेक ट्रेडिंग प्रा. लि या कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button