breaking-newsराष्ट्रिय

मी घुसखोर नाही, घुसखोरांचा बाप आहे : खासदार असदुद्दीन ओवेसी

सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए)वरून देशभरात सुरू असलेला वाद दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. या मुद्यावरून राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. आज लोकसभेत खासदार ओवेसी यांनी हा कायदा नागरिकत्व देतोपण आणि घेतोपण असं म्हटलं आहे. तसेच, एका खासदारास उत्तर देताना त्यांनी मी घुसखोर नाही घुसखोरांचा बाप आहे, असं देखील म्हटल्याने आता चर्चेसाठी नवा मुद्दा आल्याचे दिसत आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिलेले आहे.सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) नागरिकत्व देतोपण आणि घेतोपण. आसाममध्ये ५ लाख मुस्लीमांची नावं नाही आलीत. मात्र आसाममधील बंगाली हिंदूंना नागरिकत्व देऊ इच्छित आहेत… मी घुसखोर नाही घुसखोरांचा बाप आहे.. एनपीआर-एनआरसी एकच आहे. असं एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.

या अगोदर ओवेसींनी राजधानी दिल्लीतील जामियानगर येथे सुधारित नागरिकत्व कायद्या(सीएए)विरोधात सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान एका तरुणाने केलेल्या गोळीबाराच्या घटनेवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदी त्याला त्याच्या कपड्यावरून ओळखा असं ओवेसींनी म्हणाले होते. याचबरोबर ओवेसींनी केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर देखील टिप्पणी केली होती. ”अनुराग ठाकूर आणि सर्व राष्ट्रवाद्यांना धन्यवाद, त्यांनी या देशात एवढा द्वेष निर्माण केला की, एका दहशतवाद्याने पोलिसांसमोर विद्यार्थ्यावर गोळीबार केला. पंतप्रधान मोदी त्याला त्याच्या कपड्यावरून ओळखा.” असं ओवेसींनी ट्विट केलेलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button