मायावती यांनी सरकारी बंगल्याचे बनवले कांशीराम स्मारक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/MAYAVATI-RESIDENCE1n.jpg)
लखनौ (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी त्यांचा सरकारी निवास असलेल्या बंगल्याचे रुपांतर कांशीराम स्मारकाता केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार उत्तर प्रदेशाच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांना ते राहत असलेले सरकारी 15 दिवसात खाली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
त्यानुसार सरकारी बंगला खाली करण्याऐवजी मायावती यांनी आपण राहत असलेल्या सरकारी बंगल्याचे कांशीराम स्मारकात रुपांतर केले आहे. सरकारी बंगल्यासमोर “कांशीराम जी यादगार विश्रामालय स्थल’ असा फलक लावला आहे. सरकारी बंगल्याच्या मुख्य दोन द्वारांमधील भिंतीवर हा फलक लावलेला आहे. त्यावर कांशीराम याचे चित्रही आहे. मात्र
बंगल्याच्या मुख्य द्वारावर “मायावती, माजी मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश’ असा फलक आहे. हा बंगला कोणाच्या नावावर देण्यात आलेला आहे, या प्रश्नाला उत्तर देताना अधिकाऱ्यांनी सांगितले, की बंगला मायावती यांच्या नावावरच देण्यात आलेला आहे. तरीही आम्ही जुन्या नोंदी तपासून पाहत आहोत.
या बंगल्याशी कांशीराम यांच्या काही आठवणी जुडलेल्या आहेत, मात्र मायावती 15 दिवसात बंगला खाली करणार असल्याची माहिती बसपाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.