महिलांच्या स्थितीवरून राहुल यांची मोदींवर टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/rahul-gandhi_express.jpg)
नवी दिल्ली – जगातील सर्व देशांमध्ये भारत हा महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक देश बनला असल्याची माहिती एका आंतरराष्ट्रीय अहवालावरून पुढे आली आहे. ब्रिटन मधील एका संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. त्यात अफगाणिस्तान, येमेन, सीरिया, नायजेरीया या देशांपेक्षाही भारतातील महिलांची स्थिती बिकट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भारतासाठी हा अहवाल अत्यंत लाजीरवाणा आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे की जेव्हा पंतप्रधान मोदी आपल्या बंगल्याच्या बागेत योगा करीत होते त्यावेळी भारत हा महिलांवरील अत्याचारच्या बाबतीत अफगाणिस्तान, सीरिया, आणि सौदी अरेबियालाहीं मागे टाकत होता. देशासाठी ही अत्यंत दुर्देवी स्थिती आहे असे त्यांनी म्हटले आहे.