breaking-newsराष्ट्रिय

मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करा: हायकोर्ट

मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीबाबत माहिती देणारे प्रतिज्ञापत्र दाखल करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी पीठाने गोव्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. न्या. आर एम बोर्डे यांनी स्थानिक नेते ट्राजनो डिमेलो यांच्या याचिकेवर हे निर्देश दिले. डिमेलो यांनी पर्रिकर यांच्या प्रकृतीची माहिती मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला असून गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या निवासस्थानातून बाहेरही आले नाहीत किंवा त्यांनी अधिकृत बैठकीत सहभाग ही नोंदवलेला नाही.

राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या एक समितीद्वारे पर्रिकर यांच्या प्रकृतीची पाहणी करुन एक वैद्यकीय अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी डिमेलो यांनी आपल्या याचिकेत केली होती. पर्रिकर यांच्यावर सुमारे ९ महिन्यांपासून गोवा, मुंबई, न्यूयॉर्क आणि दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते १४ ऑक्टोबरला दिल्लीस्थित एम्स येथून राज्यात परतल्यानंतर कोणत्याही अधिकृत कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला नाही किंवा ते आपल्या निवासस्थानातूनही बाहेर पडलेले नाहीत.

चार दिवसांपूर्वी भाजपाच्या आमदारांनी पर्रिकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. पर्रिकर यांची प्रकृती सुधारत असून लवकरच ते आपल्या दैनंदिन कार्य सुरु करतील, असे या आमदारांनी म्हटले होते. दुसरीकडे पर्रिकर यांच्या आरोग्याबाबतची स्थिती सार्वजनिक करण्याच्या मागणीची याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी पीठात सुनावणी सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button