breaking-newsराष्ट्रिय

मतपेढीसाठी ममतांकडून अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण

विश्व हिंदू परिषदेचा आरोप

आपली मतपेढी सुरक्षित ठेवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते सुरेंद्र जैन यांनी शनिवारी केला.

बंगालमधील मदरशांचा उपयोग कट्टरीकरण आणि दहशतवादी संघटनांमध्ये भरतीसाठी होत असल्याचे सुचवणारा केंद्र सरकारचा अहवाल ‘दिशाभूल करणारा’ आणि सत्याचा लवलेश नसणारा आहे, असा दावा बॅनर्जी यांनी केल्यानंतर जैन यांनी ही प्रतिक्रिया दिली.

ममता यांनी काही दिवसांपूर्वी रथयात्रेच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. त्या बंगालच्या हिंदूंना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र आता त्यांचा मुखवटा उतरला आहे. विहिंप आणि बजरंग दल यांसारख्या राष्ट्रवादी संघटनांना त्या दहशतवादी संघटना ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जेथे राष्ट्रविरोधी कारवाया सुरू आहेत, त्या मदरशांबाबत त्यांना काही अडचण नाही, असे जैन यांनी पीटीआयला सांगितले. राष्ट्रीय सुरक्षेची किंमत मोजावी लागली, तरी ती देऊन बॅनर्जी अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करणे सुरूच ठेवतील, असा आरोप जैन यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी भाजपप्रणीत केंद्र सरकारवर ‘पॉलिटिकल अ‍ॅजेंडा’ राबवत असल्याबद्दल टीका केली, तसेच बंगालमधील मदरशांबाबत ‘दिशाभूल करणारे अहवाल’ संसदेत मांडत असल्याचा आरोप केला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button