breaking-newsराष्ट्रिय

भारतीय वायूसेनेची ताकद वाढणार, लवकरच ताफ्यात दाखल होणार स्वदेशी विमाने

नवी दिल्ली : कायमच विदेशी बनावटीच्या युद्ध साहित्यावर अवलंबून असलेल्या भारतीय वायूसेनची ताकद आता वाढणार आहे. कारण भारतीय वायूसेनेच्या ताफ्यात आता स्वदेशी बनावटीचे फाइटर जेट आणि हेलीकॉप्टर्स दाखल होणार आहे. यासाठी भारताने फाइटर जेट आणि मिलीटरी हार्डवेअर बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. राजधानी दिल्लीत वायूसेनेच्या प्रमुखांसाठी आयोजित केलेल्या परिषदेत सिंह बोलत होते.

राजनाथ सिंह म्हणाले, भारतीय बनावटची रचना आणि विकासाच्या नवीन कल्पना यासाठी संधी शोधाव्या लागणार आहे. यासाठी भारतीय वायूसेनेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. भविष्यात वायूसेनेसमोर येणाऱ्या आव्हानांसाठी रणनिती आखणे गरजेचे आहे. भारतीय वायूसेनेची क्षमता वाढवण्यासाठी या संमेलनाचा उपयोग करण्याचा सल्ला देखील सिंह यांनी यावेळी दिला आहे.

वर्षात दोनदा होणाऱ्या या कमांडर्स परिषदेत वायूसेनेचे प्रमुख आर. के. भदौरिया यांच्यासह रक्षा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, रक्षा सचिव अजय कुमार आणि रक्षा सचिव (उत्पादन) संजय चंद्रा यावेळी उपस्थित होते.

आतापर्यंत भारतीय वायूसेना विदेशी फाइटर जेट्स, हेलीकॉप्टर्स आणि मिलिट्री ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टस यावर अवलंबून होती. मग त्यामध्ये रशियाचे मिग असो किंवा सुखोई विमान यांचा समावेश होता. तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावर जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेलं राफेल लढाऊ विमान भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल झालं. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिलं राफेल विमान स्वीकारलं.

एवढच नाही तर पाकिस्तानातील बालाकोट येथे झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये वापरण्यात आलेले मिराज 2000 हे फाइटर विमान देखील फ्रान्सचे होते. तसेच जॅग्वार फाइटर जेट ( यूरोप), एमआई हेलीकॉप्टर्स (रुसी), सी 17 आणि सी 130 ट्रान्सपोर्ट (अमेरिका) येथून आयात करण्यात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button