breaking-newsआंतरराष्टीय

भारतीय वंशाच्या शीख पोलीस अधिकाऱ्याची अमेरिकेत हत्या

अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या शीख पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, आरोपीनं पोलीस अधिकाऱ्यावर अनेक गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. संदीप सिंह धालीवाल असं त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. गेल्या 10 वर्षांपासून ते अमेरिकन पोलीस दलात कार्यरत होते. दरम्यान, धालीवाल यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर आरोपी एका मॉलच्या दिशेने गेल्याचं सांगण्यात आलं. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहे. धालीवाल यांच्याकडील डॅमकॅमवरून आरोपीची ओळख पटल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं.

धालीवाल यांनी संबंधित व्यक्तीची गाडी सिग्नलकडे थांबवली आणि त्याला बाहेर येण्यास सांगितलं त्यावेळी ही घटना घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. घटनेदरम्यान ती व्यक्ती एका महिलेसोबत आपल्या गाडीत बसली होती. त्याला थांबवल्यानंतर त्या व्यक्तीने धालीवाल यांच्यावर पाठीमागून गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर ती व्यक्ती एका मॉलमध्ये घुसली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button