breaking-newsराष्ट्रिय

भारतीय नन मरियम थ्रेसिआ यांना संतपद जाहीर

व्हॅटिकन सिटीमध्ये रविवारी झालेल्या एका भव्य कार्यक्रमात भारतीय जोगीण (नन) मरियम त्रेस्या यांच्यासह आणखी चौघांना पोप फ्रान्सिस यांनी संत घोषित केले.

केरळमधील त्रिशुर येथे मे १९१४ मध्ये ‘काँग्रिगेशन ऑफ दि सिस्टर्स ऑफ दि होली फॅमिली’ची स्थापना केलेल्या मरियम त्रेस्या यांना सेंट पीटर्स चौकात झालेल्या कार्यक्रमात ख्रिस्ती धर्मातील हे सर्वोच्च पद बहाल करण्यात आले

केरळमधील या जोगिणीशिवाय ब्रिटनचे कार्डिनल जॉन हेन्री न्यूमन, स्वित्झर्लंडच्या मार्गेरिट बेज या सामान्य महिला, ब्राझीलच्या सिस्टर डुल्स लोपेस आणि इटलीच्या सिस्टर गिसेप्पिना वन्निनी यांनाही संतपद देण्यात आले. या कार्यक्रमात लॅटिन भाषेतील एक ईशस्तोत्र म्हणण्यात आले. ‘आमच्या या संतांसाठी आज आम्ही ईश्वराचे आभार मानतो’, असे पोप फ्रान्सिस उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमादरम्यान, या पाच नव्या संतांची प्रचंड मोठी तैलचित्रे सेंटर पीटर्स बॅसिलिका येथे लावली होती. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स कार्यक्रमाला उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button