breaking-newsराष्ट्रिय

भारतासाठी लष्करी कारवाईचा पर्याय खुला – बिपिन रावत

नवी दिल्ली – लडाख परिसरातील चीनकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे. यासंदर्भात सध्या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेली चर्चा निष्फळ ठरल्यास भारताला लष्करी कारवाईचा पर्याय खुला आहे, असे वक्तव्य संरक्षण दलांचे प्रमुख CDS बिपीन रावत यांनी व्यक्त केले. एप्रिल महिन्यात पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढण्यास सुरुवात झाली होती. गलवान खोऱ्यातील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर हा तणाव आणखीनच शिगेला पोहोचला होता. तेव्हापासून भारत आणि चीन यांच्यात लष्करी आणि राजनैतिक पातळीवर सातत्याने बोलणी सुरु आहेत. मात्र, लडाखच्या अनेक भागांमध्ये भारतीय हद्दीतील सैन्य मागे घेण्यास चीन अद्याप तयार नाही.

या पार्श्वभूमीवर बिपीन रावत यांनी केलेले वक्तव्य अत्यंत सूचक मानले जात आहे. त्यांनी म्हटले की, लडाखमध्ये चिनी सैन्याच्या घुसखोरीसंदर्भातील मुद्दा लष्करी चर्चा किंवा राजनैतिक पातळीवर न सुटल्यास भारतासाठी लष्करी कारवाईचा पर्याय खुला आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय सैन्य आक्रमक होण्याची शक्यता आहे.

चीनची अट भारताला अमान्य, आम्ही मागे हटू पण भारतानेही फिंगर ४ पासून स्वहद्दीत मागे जावे अशी अट चीनने ठेवताच भारताने त्यास नकार दिला आहे. चिनी सैनिक फिंगर चारमध्ये स्वहद्दीत गस्त घालत नव्हते, आता तेथे सैनिकांची संख्या वाढली असल्याचे भारताला मान्य नाही. उलट फिंगर चारमध्ये भारतीय सैनिक गेल्या सहा दशकांपासून तैनात असल्याने मागे हटणार नाहीत, असे भारताने स्पष्ट केले. गेल्या तीन महिन्यांपासून चीनी ड्रॅगनची भारताने वेगवेगळ्या स्तरावर कोंडी केली आहे. चीनने स्वहद्दीत माघार घेतल्याशिवाय संबंध पूर्ववत होणार नाहीत, असे भारताने स्पष्ट केले,

हा प्रस्ताव धुडकावला-चीनने भारताला फिंगर १ वरून मागे हटण्याचा प्रस्ताव देत स्वहद्दीत मागे हटण्याची तयारी दर्शवली. भारताने हा प्रस्ताव अमान्य केला. स्वहद्दीत मागे हटणार नाही, तुम्हीच १९९३ च्या करारानुसार मागे हटा, बांधकाम हटवा असे भारताने चीनला खडसावले. लष्करी, राजनैतिक स्तरावरील चर्चेदरम्यान चीन रोजच रंग बदलत असल्याने भारताने युद्धसज्जता केली आहे.फिंगर ४ व ८ जवळ चीनने मोठ्या प्मार्णावर स्वहद्दीत बांधकाम केले. रस्ता बांधला. तात्पुरती चौकी उभारली. भारताने त्यास आक्षेप घेतला. कराराप्रमाणे चीन स्वहद्दीत पुढे येवू शकत नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button