breaking-newsआंतरराष्टीय

भारताला धक्का देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचा ‘प्लान’, कुनारमध्ये झाली बैठक

लष्कर-ए-तैयबा आणि इसिसने पाकिस्तानी लष्करासोबत मिळून अफगाणिस्तानातील अमेरिका आणि भारताच्या कार्यालयांवर हल्ला करण्याचा कट आखला आहे. अफगाणिस्तानात लष्कर-ए-तैयबा इसिससोबत मिळून काम करत आहे. भारत आणि अमेरिकेच्या हितसंबंधांना लक्ष्य करण्याची त्यांची योजना आहे. कुनार प्रांतातील जाबा भागात लष्कर-ए-तैयबा, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयची एक बैठक झाली. त्यामध्ये लष्कर-ए-तैयबाला अफगाणिस्तानातील भारत आणि अमेरिकेच्या कार्यालयांवर हल्ला करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

गुप्तचर अधिकारी तसेच नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील राजनैतिक अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. तैयबाच्या कमांडर्सवर वेगवेगळया प्रकारचे हल्ले करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी पाकिस्तानातून आत्मघातकी हल्लेखोर पाठवण्यात येणार आहेत. एफएटीएफ आणि अमेरिकेकडून पाकिस्तानवर मोठया प्रमाणावर दबाव आहे तरीही पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया बंद करायला तयार नाही.

अलीकडेच लष्करचा संस्थापक हाफिझ सईदला दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आहे. पेंटागॉन आणि संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार अफगाणिस्तानमध्ये तैयबाचे शेकडो दहशतवादी सक्रीय आहेत. पेंटागॉनच्या अहवालानुसार हा आकडा ३०० तर यूएनच्या अहवालानुसार हा आकडा ५०० आहे. कुनार आणि नानगारहार प्रांतामध्ये हे दहशतवादी आहेत. अफगाणिस्तानात लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादांची संख्या वाढत आहेत. हाफिझ सईदचा मुलगा तलहा सईद अफगाणिस्तानात जास्त रस घेत आहे असे नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button