breaking-newsराष्ट्रिय

भारताच्या संरक्षण सामग्री निर्यातीत दुपटीने वाढ

भारताच्या संरक्षण सामग्री निर्यातीत दुपटीने वाढ झाली असून ती 11 हजार कोटींच्या जवळ पोहोचली आहे. संरक्षण सामग्रीच्या निर्यातीबाबत तयार करण्यात आलेल्या धोरणांमध्ये आलेली सुलभता आणि देशांतर्गत कंपन्यांच्या अधिक ऑफसेट प्रोजेक्ट्समुळे अमेरिकेतील बाजारात मिळालेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भारताची संरक्षण सामग्री निर्यात दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे.

2017-18 मध्ये भारताची संरक्षण सामग्री निर्यात 4 हजार 682 कोटी रूपये होती. 2018-19 मध्ये वाढून ती 10 हजार 745 कोटी रूपयांवर पोहोचली आहे. दरम्यान, भारतीय कंपन्यांना ठराविक देशांना संरक्षण सामग्रीची निर्यात करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक नवा जनरल एक्सपोर्ट लायसन्स प्लान तयार केला आहे. भारताच्या संरक्षण सामग्री निर्यातीत सर्वात मोठा वाटा अमेरिकेचा आहे. अमेरिकेत 5 हजार कोटी रूपयांच्या संरक्षण सामग्रीची निर्यात केली जाते. अमेरिकेनंतर भारत इस्त्रायल आणि युरोपियन युनियनला सर्वाधिक संरक्षण सामग्री निर्यात करतो. काही धोरणांमध्ये बदल केल्यानंतर संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत मोठी वाढ झाल्याची माहिती काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ‘ओपन जनरल एक्सपोर्ट लायसन्स’ची प्रक्रिया काही दिवसांमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला जागतिक बाजारपेठेत भारताला अधिक संधी मिळणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

संरक्षण मंत्रालय सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांना कंपोनंट एक्सपोर्टच्या पुढे जाऊन ज्या ठिकाणी मूल्यवर्धन केले जाऊ शकते, अशा प्लॅटफॉर्म्सवर पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या विचारात आहे. भारत सध्या संरक्षण क्षेत्रात कंपोनंट्सची सर्वाधिक निर्यात करत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील डेटावरून स्पष्ट होत आहे. यामध्ये छोट्या शस्रांच्या भागांची सर्वाधिक मागणी आहे. सध्या आम्ही स्पर्धात्मक, तसेच खरेदीदार जी किंमत चुकवतील त्या किंमतीचा त्यांना योग्य मोबदला देण्यावर आम्ही भर देत असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण निर्मिती विभागाचे संयुक्त सचिव संजय जाजू यांनी डिफेन्स एक्सपोर्ट सेमिनारदरम्यान सांगितले होते. दरम्यान, उत्पादनाच्या निर्मितीची कमी किंमत आणि ऑफसेट क्लॉजमुळे भारताची निर्यात वाढली असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button